अवांतर

जीवन 
डोक्यावर चमकता मणी घेऊन गुप्त खजिन्याची राखण करीत बसलेले नागोबा तुम्हांला  पावलोपावली मिळतील.  
                        पण आजूबाजूला बनत चाललेली मुंग्यांची वारुळंत्याच्या नजरेतून सुटत नाहीत, म्हणून तो त्या बिळांची वाट धरतो आणि आपला चमकता मणी घेऊन त्या वारुळावरून खजिन्यावर आयुष्यभर पहारा करत बसतो
                        एक दिवस पहार घेऊन माणूस येतो, वारूळ  फोडून मणी पण मिळवतो मातीपण. आणि खड्डा मोठा खणला असेल तर बाजूच्या गुप्तधनाच्या घागरीलाही टिकाव लागतोच. आणि ते तो सोबत घेऊन,
                        नवीन वारूळ शोधून अथवा तयार करून नागोबा होऊन बसतो, डोक्यावर मणी ठेवायला पण विसरत नाही.  ..... .... .... ... जीवन

Comments

  1. अवांतर 7 5 2020

    ( ग्रुप मध्ये शुभदा असायला हवी होती .... का.... वाचत रहा अवांतर..)

    धुके 

    सिंहगड वर outdoor sketching साठी जाण्याचे ठरले होते. 
    ज्या दिवशी निघायचे त्या दिवशी तब्येत थोडी बिघडली. सकाळी ६ चा time होता निघण्याचा. खरं तर जाण्याची खूप इच्छा होती  .. .. पण मी बळे - बळे नको जायला असे ठरवले. ताप होता.. आईनेही दुजोरा दिला. 
                  मला विश्रान्ती घेण्याचा उबग येऊ लागला, अस्वस्थता वाढली. कसाबसा तासभर काढला आणि ठरवले जायचे. बॅग भरली, तयार झालो, निघालो. 
                  पावसाळ्याचे दिवस असावेत (होतेच) दाट धुके होते. प्रत्यक्षात आणि मनातही. पाऊस नुकताच झाल्याने सर्व वातावरण माझ्यासाठी (आजारी असल्याने) अनुत्साही होते.  तरी अंगात ज्वर घेऊन  संथपणे गड चढायला सुरुवात केली. हवा अत्यंत ताजी आणि वातावरण स्वच्छ - प्रसन्न होते. पण मला तितके अनुभवता येत नव्हते. 
                    माझी सिंहगडावर येण्याची हि पहिली वेळ नव्हती. कुठूम्बियासोबत मी येथे आलो होतो. त्यावेळी दोघे भाऊ सर्वात अगोदर वर पोहचून; खालील सर्वांना वरून हात करायचॊ. 
                    आज कदाचित तो सर्रास अनुभव स्वस्थ राहू देत नव्हता. थोड्याश्या चढीने मला थंडीतही घाम येऊ लागला; दम लागू लागला. काही वेळ विश्रांती ... नंतर पुनः सुरुवात केली... अंगातील ज्वर थोडा कमी झाला होता. किंचित हलके वाटले... अंमळ थबकत... टप्पे कमी करत चढण चढत राहिलो. आणि पोहचलो. आता बऱ्यापैकी हुशार वाटत होते.. 
                      वर्गातले कोठे असतील, काय करत असतील याचा या परिस्थितीत शोध घेण्याची अजिबात इच्छा नव्हती. मी अशा बाजूने चढलो होतो व अशा ठिकाणी पोहोचलो की जेथे मंदिर होते. त्याच्या पुढील बाजूस ... टिळक बंगल्याच्या बरेचसे आसपास ... ( धुक्यातली आठवण) 
                       धुक्याचे प्रमाण ८०% असेल. फक्त काही अंतावरचेच ( ५-७ फूट ) दिसत असावे. हळू हळू मळभ हटत होते. निरव शांतता हवीहवीशी वाटत होती. 
                        मी एका ठिकाणी हळुवार स्थिर झालो.... मला आपल्या वर्गातील मुलांमुलींचा आवाज ऐकू येऊ लागला. कदाचित गाण्यांच्या भेंड्या चालू असाव्यात.. मी याकडे निर्विकार पाहत होतो. एकाचवेळी एकीकडे सहभागी नसण्याचा आणि उपस्थित असण्याचा अजबच प्रकार अनुभवत होतो. पण मी मनाचा कल न घेता शरीराचे ऐकायचे ठरवले. त्याने मला येथे का आणले होते. मी धुक्याकडे आवाजाच्या दिशेने पाहत राहिलो ... धुक्यातून आवाज आला .... 
                         " अगं, तो बघ, दत्ता, दत्तासारखाच दिसतोय ना .." शुभदा चा आवाज होता. तिच्याबरोबर कोणी असावे. पण मी तसाच निर्विकार पाहत राहिलो. नाही म्हंटले तरी एक व्याकूळता घामेजून आली. मी स्तब्ध मान मोठ्या संयमाने हळूहळू शहरावरील धुक्यावर वळवली.  त्या आवाजाने माझा शोध घेतला नाही. 
                         दीर्घ श्वास घेतला . . . .. .. कान तप्त झाले होते.. ते नरम होऊ लागले. 
                         मी तसूभर पावले सांभाळून स्थिर भक्कम झालो.  
                          आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात लख्ख प्रकाश पडला. सर्व धुके, सर्व मळभ एका क्षणात नाहीसे होऊन प्रकाशाची तीव्रता ऐवढी वाढली होती की खालील झाडे, घरे अगदी प्रकाशात प्रदीप्त होऊन सर्वच प्रकाशमय झाले होते... हे सर्व सूर्यासमोरील एक 
                            काळे ढग हटल्याने घडले होते. पण दृश्यमानता खूप सुंदर होती. अलौकिक. 
                            अशी दृश्ये थोड्याफार फरकाने मी नंतर खूपदा अनुभवली. अगदी आकाशदेवतेने आशिर्वादाचा हात उंचवावा व  त्यातुन आशिर्वादरूपी तेज फाकावे असे काही. 
                             नंतर यथावकाश मी घरी पोहोचलो व नेहमीप्रमाणे वर्गही सुरु झाले. 
                             जीवन जेव्हा म्हणुन निरस आहे असे वाटले  निसर्गाने मला उदात्तता दाखवली ... 
                             जेव्हा म्हणून आनंदात होतो त्यावेळेस समाज्याच्या हालअपेष्टा समोर मांडल्या व बरोबर स्वतःलाही. 
                              - तो निसर्ग आणि मी : अवांतर वाचत रहा . धन्यवाद.  

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ll वंद्य वंदे मातरम् ll VANDY MATRAM